शेंदुर्णी ता.जामनेर (वार्ताहर) : लाँकडाऊन सुरु झाल्यापासुन शेंदुर्णीत एस.टी.बसेस,खाजगी बसेस बंदच होत्या.यामुळे अनेकांना अडचणी निर्माण झालेल्या होत्या आता काही प्रमाणात एस.टी.बसेस सुरु केलेल्या आहेत मात्र त्यांची संख्या अगदीच कमी आहे. शेंदुर्णी हुन जळगाव जाण्यासाठी सध्या बसच नाही यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
बसेसची संख्या कमी,त्यातही फक्त २२ प्रवासी घेतले जाते. जेथुन बस निघते तेथूनच जर आवश्यक प्रवासी बसले तर मग पुढच्या गावातील प्रवासी बसु शकत नाही यामुळे बस आल्यानंतर सुद्धा बस मध्ये बसताच येत नाही. काही वेळा जास्त प्रवासी असतात तर काही वेळा प्रवासी नसतात सुद्धा यामुळे एस.टी.महामंडळाला कधी फायदा तर कधी तोटा सहन करावा लागत आहे. शेंदुर्णीत सध्या येणाऱ्या एस.टी.बसेसची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी होत आहे.