शेंदुर्णी :- पंतप्रधान जन आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत योजनेतील दोन हजार लाभार्थ्यांना शेंदुर्णीत कार्डाचे वितरण जामनेरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन पंचायत समितीच्या सभापती सौ.निताताई पाटील शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नगरपंचायतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी केले.त्यांनी शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने होत असलेल्या विविध कामांची माहिती दिली.केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजना याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरिशभाऊ महाजन यांनी शेंदुर्णीस भरघोस निधी सातत्याने दिला असुन आगामी काळातही हाजरो कोटींचा निधी शेंदुर्णीस मिळणार आहे यातुन आदर्श गाव शेंदुर्णी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात, नारायण गुजर,शिवसेनेचे नेते पंडितराव जोहरे,पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, नगरसेविका सौ.साधना बारी,सर्व नगरसेवक, मान्यवर ,लाभार्थी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात शेंदुर्णीत दहा हजार व दुसऱ्या टप्प्यात दहा हजार अश्या वीस हजार कुटुंबातील सदस्यांना याचा लाभ होणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पं.दिनदयाल उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांनी तर आभार नगरसेवक निलेश थोरात यांनी मानले