शेंदुर्णी :- शेंदुर्णीत बारी समाजातील संत रुपलालजी महाराज यांच्या पुण्यतिथी व हनुमान जयंती निमित्ताने संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास आजपासून शनिवार रोजी सुरुवात झाली असुन या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपली सेवा देणार आहे. यंदाचे हे १४ वे वर्ष आहेत. यानिमित्त सकाळी काकडा आरती,विष्णुसहस्रनाम,गाथा पारायण, दुपारी प्रवचन, हरिपाठ व रात्री संकीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम आहे.
भव्य शोभायात्रा
सकाळी वाडी दरवाजा भागातील हनुमान मंदिराच्या पासुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संत रुपलालजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजया खलसे व पं.दिनदयाल पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी बारी समाजातील सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच समाज बांधव उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या भव्य मिरवणुकीत वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, हरिपाठ महिला भजनी मंडळ, बँण्ड पथक ,कलशधारी महिला,युवती,भाविक, समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शनिवारी दि.२०/०४/२०१९ रोजी ह.भ.प.सुनिलजी महाराज ,विखरणकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.या सप्ताहात ह.भ.प.गोपालजी महाराज, सांजोरीकर.ह.भ.प.मच्छिंद्र महाराज, वाडीभोकर.ह.भ.प.कैलास महाराज, टेकावडेकर.ह.भ.प.रविंद्र सिंह महाराज, वरसाडेकर.ह.भ.प.शिवाजी महाराज बावस्कार तर शुक्रवारी दि.२६/०४/२०१९रोजी ह.भ.प.पोपट महाराज ,कासखरखेडेकर यांचे कीर्तन होईल. दि.२७/०४/२०१९ शनिवार रोजी सकाळी ह.भ.प.पोपट महाराज कासारखेडेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
या सप्ताहात पंचक्रोशीतील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य,मृदुंगाचार्य,हार्मोनियम वादक,विविध ह.भ.प.महाराज यांचा सहभाग असुन मोठ्या प्रमाणात हा सप्ताह होत असतो.यासाठी समस्त ग्रामस्थ तथा बारी समाज,बारी युवा मित्र मंडळ, श्री.त्रिविक्रम महाराज भजनी मंडळ व हरिपाठ महिला भजनी मंडळ, संत कडोजी महाराज भजनी मंडळ व नागवेली मित्र मंडळ शेंदुर्णी यांचे सहकार्य लाभले आहे.