शेंदुर्णीतील एका खाटीक व्यावसायिकांवर गोळीबार; एक जण जखमी

0

जळगाव, प्रतिनिधी  

शेंदुर्णी येथील एका खाटीक व्यावसायिकांवर लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील जनता सायजिंगजवळ घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला. या  घटनेनंतर संशयित फरार झाले असून त्यांचा शोध घेत आहेत.

जामनेर तालुक्यातील  शेंदुर्णी येथील चौघे खाटीक व्यावसायिक बकऱ्या विक्रीसाठी पिकअप वाहनाने मुंबईकडे जात होते. त्यांचे वाहन मालेगाव शहराजवळ येताच दुचाकीवरून तिघांनी त्यांचा पाठलाग केला.  त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वाहन न थांबवल्याने संशयितांपैकी एकाने वाहनावर गोळीबार केला. गोळी क्लीनरच्या बाजूस बसलेल्या जावेद खाटीक यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबार करून संशयित फरार झाले. घटनेनंतर चालकाने मनमाड चौफुली भागात थांबून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली. जखमी जावेदला धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

सदर हल्ल्याचे कारण स्पष्ट नसले तरी लुटीच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील हॉटेल्स व इतर दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.