तालुक्यातील शिंदी येथील घटना
भुसावळ :- गाईजवळ नालीतून घाण फेकू नको, असे सांगितल्याचा राग आल्याने येथे पिता पुत्रांनी वृद्ध व त्यांचे पत्नीस शिवीगाळ करीत मारहाण करित असतांना डॉ. सचिन महाजन यांच्यावर चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि.१३ मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिंदी येथे घडली.
याबाबत तीघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिंदी येथील पितांबर महाजन यांनी आरोपी संतोष निकम याला कचरा आमच्या घराकडे नको टाकू असे सांगितल्याचा राग आल्याने दीपक महासिंग निकम, संतोष महासिंग निकम व महासिंग काशीनाथ निकम यांनी पितांबर महाजन यांना शिवीगाळ करीत दगडाने पाठीवर मारहाण केली तसेच पीतांबर महाजन यांच्या पत्नीला चापटांनी मारहाण केली. आई व वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहुन पशुवैद्यकीय डॉ. सचिन महाजन यांनी भांडणात मध्यस्ती करत सोडविण्याचा प्रयत्न केला असता संतोष निकम याने त्यांच्या हात, गाल, मान, डाव्या कानाजवळ चाबीच्या लोखंडी पट्टीने वार करुन गंभीर जखम केले. जखमी डॉ. महाजन यांना त्वरित येथील नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन येथील खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तालुका पो.स्टे.चे पो.नि. रामकृष्ण कुंभार यांनी तात्काळ घटनास्थी जाऊन पहाणी केली. याबाबत तालुका पोलिसात डॉ. सचिन पितांबर महाजन (रा. शिंदी) यांच्या फिर्यादीवरुन दीपक महासिंग निकम, संतोष महासिंग निकम, महासिंग काशीनाथ निकम (तीघे रा. शिंदी ता. भुसावळ) यांच्या विरद्ध गु.र.नं. ९८/१९, भा.दं.वि.३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.