लासुर ता.चोपडा(वार्ताहर) :- येथील सरस्वती क्लासेस चा संचालिका सौ.शीतल विनोद महाजन यांना नुकतेच चोपडा तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया चा वतीने देण्यात येणाऱ्या दामिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मिसेस ग्लोबल वर्ल्ड प्रिन्सेस(दक्षिण आफ्रिका) श्रीमती अनिताताई राठोड यांचा हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.त्यांना दामिनी पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.