शिस्त न पाळणाऱ्या पाच ग्रामसेवकांवर दंडात्मक कारवाई

0
पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी केली कारवाई
बोदवड – पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक यांना परिसरात स्वच्छता ठेवणे,शासकीय कामकाज वेळेत ओळखपत्र जवळ बाळगणे बाबत पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी गेल्या २ महिन्यांपूर्वी आदेशीत केले होते.बहुतेक ग्रामसेवक हे नियुक्ती असलेल्या ग्रामपंचायतीला हजर तसेच वेळेवर उपस्थित नसतात.त्यामुळे नागरिकांना विविध अडचणी निर्माण होत असतात.त्यामुळे संबंधित ग्रामसेवकांना सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीला हजर राहणे अनिवार्य केले आहे.व तसा आदेशही पंचायत समिती स्तरावरून काढण्यात आला आहे.
मात्र १७ रोजी पंचायत समितीत ८१ गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आराखड्या बाबत सभापती किशोर गायकवाड व गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांनी ग्रामसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी शिस्त न पाळणाऱ्या व ओळखपत्र जवळ न बाळगणा-या पाच ग्रामसेवकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड व नोटीस यावेळी बजावण्यात आली.
तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये  सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ग्रामसेवकांनी हजर रहावे, जेणेकरून नागरिकांची शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ होणार नाही.तसेचं शासकीय कामकाज वेळेत कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.यासंह पंचायत समितीच्या परिसरात स्वच्छता ठेवणे अनिवार्य असून यापुढेही सुचनांचे व नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापती किशोर गायकवाड यांची दिला आहे.
या कारवाईमुळे कामचुकार व शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.