यावल :(सुरेश पाटील) – जगप्रसिद्ध श्री महर्षी व्यास मुनी यांची भारतात फक्त नैमिनश्याअरण्य, काशी व (महाराष्ट्रात एकमेव यावल येथे) यावल येथे मंदिरे आहेत, यावल हे महर्षी व्यासांच्या तपोभूमी चे पवित्र जागृत क्षेत्र आहे त्यामुळेच या स्थानाला स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे अशा श्री महर्षी व्यास पूजनाचा अर्थात गुरुपौर्णिमेचा उद्या दिनांक 16 मंगळवार हा पवित्र दिवस तसेच या दिवसाला गुरु-शिष्य या नात्याचे खूप महत्त्व आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.
व्यासरचित महाभारत भारतीय जीवनाशी अगदी एकरूप झाले आहे एखादी कठोर प्रतिज्ञा ही भीष्मप्रतिज्ञा या नावाने ओळखले जाते तर उदार व्यक्तीला कर्णाची उपमा मिळते, एकाग्रतेचे उदाहरण द्यायचं झालं तर अर्जुन मापदंड ठरतो, आणि कुठे मोठं भांडण सुरू असेल तर काय महाभारत सुरू आहे असे सहजपणे म्हटले जाते, दूरदर्शन वर महाभारत ही मालिका सुरू असताना साऱ्या भारतभर रस्त्यारस्त्यातुन कसा शुकशुकाटच असायचा याची रसभरीत वर्णन त्यावेळी अनेक वृत्तपत्रातून येत असत नाट्य-चित्रपट सृष्टी ही या प्रभावातून दूर राहू शकली नाही महाभारतावर आधारित अनेक नाटक किंवा कलियुग आणि अगदी अलिकडला राजनीति यासारखे चित्रपटही आले पण मला आठवतो तो न.चिं. केळकरा सारख्या विद्वान वाचकांच्या आयुष्यातला प्रसंग त्यांना एकदा कुणीतरी विचारले तुम्हाला दीर्घकाळपर्यंत विजनवासात राहावे लागले व त्यावेळी केवळ एकच ग्रंथ बरोबर नेता येणार असेल तर तुम्ही कोणता न्याल ? क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले होते महाभारत. आणि अशा पवित्र महाभारताची काही पर्व श्री महर्षी व्यास यांनी श्री गणेश यांच्या माध्यमातून यावल येथे लिखाण केले असल्याची अख्यायिका आहे.
व्यासांचे कुळ
व्यासांचे मूळ नाव कृष्ण द्वैपायन, वेद व पुराणात सापडणार्या वर्णनावरून कश्यप , जमदग्नी , गौतम , विश्वामित्र , भारद्वाज ,व वसिष्ठ या सप्तश्री पैकी वसिष्ठांच्या कुळात व्यासांचा जन्म झाला हे सर्व मंत्रद्रष्टे कृषी आहेत, यापैकी कृर्वेदातील 71 मंत्र कश्यपानी आणि 79 जमदग्नींनी, 130 अत्रिनी, 211 गौतमांनी , 501 विश्वामित्रांनी तर सर्वात जास्त म्हणजे 800 मंत्र वसिष्ठांनी रचले म्हणून वसिष्ठांचे स्थान या सर्वांमध्ये वरचे आहे.
श्री व्यास पौर्णिमा उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी, स्री- पुरुष महिलांसाठी 21 क्विंटल बुंदीचा प्रसाद, 25 क्विंटल पुलाव तसेच व्यास मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम, महारक्तदान शिबिर, ग्रामीण रुग्णालय यावल व महाले यांच्या संयुक्त विद्यमाने स्री व् पुरुष यांची थायरॉईडची मेडिकल तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे तसेच व्यास मंदीराच्या विविध कार्यक्रमात तालुका परिसरातून येणाऱ्या सर्व दिंड्या सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बोरावल गेट चा राजा यांच्यातर्फे येणाऱ्या भाविकांना दिवसभर मोफत आरोचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणार आहेत यावरून शहर व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी व्यास पौर्णिमे निमित्त आर्थिक मदत व महाप्रसादासाठी धान्य स्वरूपात मदत करावी असे आवाहन श्री व्यास व श्री राम मंदिर संस्थान यावल तर्फे करण्यात आले आहे