शिष्यवृत्ती जाहीर करून मूलाने फेडले एस कर्मचार्यांचे ऋण, चाळीसगाव येथील घटना

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : वडिलांच्या सेवानिवृत्ती निमित्त मुलाने दिली एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनोखी भेट या भेटीचा संपूर्ण महाराष्ट्रातून भूषण यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

या बाबतीत घटना अशी की  चाळीसगाव आगारातील कैलास महादू चौधरी वाहक पदावरून दिनांक 31 जून रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचे चिरंजीव भूषण कैलास चौधरी हे सध्या चाळीसगाव येथे महावितरण कंपनीमध्ये इंजिनीअर या पदावर कार्यरत आहे वडिलांच्या सेवानिवृत्ती निरोप संभारंभ कार्यक्रमाचे वेळी भूषण चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी पाचवी ते दहावी एसटी महामंडळाकडून शिष्यवृत्ती मिळवलेली आहे ,एस कर्मचार्यांच्या सहकार्य व आशिर्वादाने आज मी इंजिनिअर सारख्या उच्च पदावर पोहोचलो आहे.

आज मी वडिलांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने मीदेखील एस मंडळातील अधिकारी किंवा कर्मचारी बांधव असतील त्यांच्या मुलांमुली मध्ये पाचवी ते दहावी पर्यंत विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून शिष्यवृत्ती जाहीर करतो असे सांगून भूषण चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अनोखी भेट देऊन एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना दिली.या त्याचे कौतुकास्पद कार्याचं संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे त्यानिमित्त त्याची सत्कार करताना विजय शर्मा व शांताराम पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.