बोदवड न्यायालय शिवजयंती साजरी;छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन
बोदवड प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्म,महिला,पुरुष याविषयी सन्मानाची आदराची भावना ठेवून न्याय व्यवस्थेमध्ये सर्वांना समान न्याय देणारी न्यायव्यवस्था होती.त्यामुळेच आज राजेंची न्यायव्यवस्था समतावादी होती. शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था जलद व मोफत न्याय या तत्त्वाला धरून होती. त्यामुळे जनतेला राजांच्या न्याय व्यवस्थेविषयी आदर होता.आजही महाराजांची न्यायव्यवस्था आदर्श असल्याचे प्रतिपादन अँड.अर्जून पाटील यांनी यावेळी केले.
बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात बोदवड तालुका वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांच्या वतीने न्यायालय स्थापनेपासून पहिलीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राज्यव्यवस्था यावर एडवोकेट के.एस.इंगळे,यांनी आपले विचार मांडले.
तर छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था या विषयावर ॲड.अर्जुन पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.चंद्रसिंग पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील,तर प्रमुख उपस्थिती म्हणून न्यायालय अधीक्षक जे.बी.पाटील यांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर पक्षकार वकील मंडळी,न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमाचे आभार ॲड.सौ मीनल अग्रवाल यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी वर्ग व बोदवड तालुका वकील संघ यांनी परिश्रम घेतले.