रेल्वे रूळ ओलांडून जीव घेणे प्रवास
जळगांव, दि . १३ – शिवाजी नगर पूल तोडल्यापासून त्या परिसरातील नागरिकांना सुरत रेल्वेगेट कडून चार कि.मी अंतराने जावे लागते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. वाहनचालक शॉर्ट कट मार्गाचा वापर म्हणून रेल्वे रूळ ओलांडून जीव घेण प्रवास करीत आहेत. यात दुचाकी, सायकलस्वार तसेच पायी चालणाऱ्याची संख्या अधिक आहे. दुपारच्या वेळेस रेल्वेगेट बंद असते. त्यावेळी इतके तापमान असते कि, तिथे उभे राहणे कठीण असते. त्यामुळे नागरिक शॉट कट मार्गाचा वापर करण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडून जीवमुठीत घेऊन प्रवास करीत असतात .
रेल्वेरूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा —
रेल्वे रूळ ओलांडून जाणे कायद्याने गुन्हा आहे पण याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने काही दुर्घटना घडतात. याला जबाबदार कोण ? रेल्वे प्रशासन की स्वतः नागरिक ? असा प्रश्न उपस्थित होतो. नियोजन न करतात पूल तोडण्याच निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
शिवाजीनगर कडून तहसील कार्यालयाकडे येण्यासाठी काही नागरिक शिवाजीनगर चौकमध्ये राहणाऱ्यांच्या घरासमोर दुचाकी वाहने लावतात याप्रकारामुळे त्याभागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी घरासमोर वाहने लावू नये, यासाठी नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे तसेच दोरी बांधून नो पार्किंगचा प्रकार करण्यात आलेला आहेत.
गुरुनानक नगर पुलाचे काम १ जून पर्यंत मार्ग होणार पूर्ण —
शिवाजीनगर कडून येण्यासाठी लेंडीनाल्या जवळील गुरुनानक नगर पुलाचे काम १ जून पर्यंत पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती ठेकेदार राहुल धांडे यांनी दिली.