Thursday, September 29, 2022

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ.दीपक सावंत पक्षाला देणार सोडचिठ्ठी ?

- Advertisement -

मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्ष मिळून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे सरकारसमोर आता अडचणी उभ्या असल्याचे दिसत आहे. कारण मोठ्या प्रतिक्षेनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या थाटामाटात पार पडला असला तरी तिन्ही पक्षातील अस्वस्थ नेत्यांमध्ये मोठी भर पडली आहे. त्यातच नाराज असणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांची मोठी संख्या आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि युती सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिलेले डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. आपल्याला पक्षात कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. मी केवळ शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून बांधलेले शिवबंधन ठेवायचे की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेऊ, असे सावंत यांनी म्हटल्याचे माध्यमांत आले आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून सावंत हे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. गेल्या वर्षी सावंत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नव्हती. त्यावेळीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांचे मंत्रिपदही काढून घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांची खदखदही वाढली होती. परंतु, त्यावेळी त्यांनी शांत राहणेच पसंत केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे, आणि मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे.परंतू, यात त्यांना स्थान देण्यात आले नाही.

- Advertisement -

- Advertisement -

शिवसेनेचे नेते माजी मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक वाद झाल्याचेही सांगण्यात येते. त्याचबरोबर शिवेसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे तेही पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त विविध माध्यमांत आले होते. आता राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अब्दुल सत्तार यांनीही कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरील संकटात वाढ होताना दिसत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या