शिवसेनेची २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0
38

लोकसभा निवडणूक२०१९ साठी आज शिवसेनेने आपल्या २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज ‘मातोश्री’वरून ही पहिली यादी जाहीर केली आहे. एनडीएतील भाजपचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या यादीत अपेक्षेप्रमाणे काही अपवाद वगळता सर्वच जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र सातारा पालघर या दोन जागांचा तिढा अजूनही सुटला नसून येत्या २४ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या युतीच्या महामेळाव्यात या दोन जागांची घोषणा होईल, असे शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी

१. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
२) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
३) उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर
४) ठाणे – राजन विचारे
५) कल्याण – श्रीकांत शिंदे
६) रायगड – अनंत गिते
७) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
८) कोल्हापूर – संजय मंडलिक
९) हातकणंगले – धैर्यशील माने
१०) नाशिक – हेमंत गोडसे
११) शिर्डी – सदाशिव लोखंडे
१२) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
१३) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
१४) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
१५) बुलढाणा – प्रतापराव जाधव
१६) रामटेक – कृपाल तुमाने
१७) अमरावती- आनंदराव अडसूळ
१८) परभणी- संजय जाधव
१९) मावळ – श्रीरंग बारणे
२०) हिंगोली-हेमंत पाटील
२१) उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here