शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला ; देवेंद्र फडणवीसांची टीका

0

मुंबई : कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी तत्कालीन सेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी, अत्यंत आश्‍चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतले पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्वे, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळे आहे का ? एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे. असही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, साईबाबा हे सगळ्याचं श्रद्धास्थान आहे. त्यांच्याभोवतीअसा वाद होणं दुर्दैवी आहे. सरकारमुळेच हा वाद निर्माण झाला आहे. सरकारने पुढाकार घेऊन वादावर तोडगा आणला पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.