शिवसेना व मुक्ती फाऊण्डेशतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न !

0

जळगाव-सामाजिक बांधलकीतून शिवसेना धरणगाव मुक्ती फाऊन्डेशनतर्फे वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्ताने जेष्ठासाठी विशेष नेत्र चिकित्सालय (मोतीबिंदू) कुत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन १९फेब्रुवार बुधवार रोजी करण्यात आले होते.

तसेच राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना गुलाबराव पाटील याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात  आयोजित केले होते,ज्या जेष्ठ वयोवृद्धांना  कमी दिसत होते त्याचे  नेत्र तपासणी करून  त्याची लेन्स शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली, 

या सर्व रुग्णांना विनामूल्य औषधी ड्रॉप काळे चष्मे वाटप करण्यात आले,  या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण अधिष्ठाता  डॉ भास्कर खैरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, तसेच समस्त जिल्हा पदाधिकारी शिवसैनिक आणि मुक्ती फाऊण्डेशतर्फे  मुकुंद गोसावी नेत्र विभागाचे डॉ यु बी तासखेडकर, डॉ प्रसन्न पाटील,डॉ प्रवीण पाटील, नेत्र चिकित्सालय अधिकारी आदींचे सहकार्य यावेळी  लाभले.    

Leave A Reply

Your email address will not be published.