शिवसेना-युवासेना व महिला आघाडीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र स्थापन

0

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील शिवसेना शिवतिर्थ शिवसेना कार्यालय  येथे पाचोरा-भडगाव शिवसेना-युवासेना आणि महिला आघाडी व इतर शिवसेना अंगीकृत संघटना तर्फे  सांगली-सातारा-कोल्हापुर जिल्ह्यात महापुरात अडकलेल्या नागरीकांसाठी एक हात मदतीचा मिळावा या हेतूने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व नागरीकांना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी बांधवांना शक्य होईल तेवढी आर्थिक मदत स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन महापुरात अडकलेले लोकं हे परके नसुन ते आपले जवळचेचं कोणीतरी आहे.  हा स्वच्छ हेतु मनात ठेऊन त्यांना केलेली मदत म्हणजेचं माणुसकीसाठी केलेली मदत असेलं शिवतिर्थ शिवसेना कार्यालय  येथे सकाळी १० वाजेपासुन मदतनिधी कॅम्प सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आमदार किशोर पाटील यांनी 51 हजार रुपये दिले. या मदतनिधी कॅम्प मध्ये आपण आपआपल्या परीने शक्य होईल तेवढी रोखमदत किवा आज आपल्याला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे पूर्ण झाली आहे. तर किमान ७६ रुपये ची मदत निधी प्रत्येकाने जमा करण्याचे आव्हान यावेळी आमदार किशोर पाटील यांनी केले. जेणेकरून त्या जमा  होणाऱ्या आर्थिक मदत निधी मधुन सांगली, कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्यांसाठी व ज्या कुटुंबांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्यांना एक मदतीचा हात म्हणुन खांद्याला खांदा लावुन  कुठलेही जात-धर्म-पंथ पक्ष उच्च-निच्च हा भेदभाव न बाळगता ” फक्त माणुसकी “हा धर्म पाळुनी आपल्यातं असलेली माणुसकीरूपी दिव्य ज्योत प्रज्वलीत करून ज्यांचे या महापुरामुळे आयुष्यात अंधार पडलेला आहे कुठे तरी ते अंधार आपली एक छोटीशी मदतीची  पणती’ च्या प्रकाशाने दुर होईल आणि या जमा मदतनिधीतुन महा-पुरग्रस्त पिडीतांना रोख स्वरूपात मदत किंवा जीवनावश्यक वस्तु पाठवुन मदत केली जाणार आहे. यावेळी पाचोरा-भडगाव शिवसेना – युवासेना आणि महिला आघाडी व इतर शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.