मुंबई :– शिवसेना युतीत सडली आणि १२४ जागांवर अडली असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला. हया असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायचं असेल तर सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी गोरेगावाच्या सभेत शिवसेना आणि भाजपावर कडाडून टीका केली. सत्तेत असताना मधल्या काळात शिवसेना-भाजपचे संबंध विविध कारणांवरुन ताणले गेले होते. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना युतीत इतकी वर्ष सडली असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आधार घेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर जागावाटपावरुन निशाणा साधला. इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यावेळी राजीनामा खिशात घेऊन फिरतो असं म्हटलं, मात्र कधी राजीनामा दिला नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नुसत्या थापा मारल्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं. मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती. आरेमध्ये कार शेड नको यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला. ज्याठिकाणाहून मेट्रो सुरु होत तिथे कार शेड करा, सरकारला सूचवलं होतं. मात्र सरकारला कोणाच्या घशात ती जागा घालायची आहे? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.