शिवसेना-भाजपच्या युतीनंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

0

जळगाव:- गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना व भाजपा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अशातच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडण्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे सर्वात आघाडीवर होते. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर खडसे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. युती झाल्यामुळे भविष्यात फक्त भाजपचा नव्हे तर युतीचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य खडसे यांनी सांगितले. २०१४ साली भाजपला राज्यात अनुकूल वातावरण होते. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, यावेळची परिस्थिती पाहता युती झाली ते बरेच झाले. गेल्यावेळी भाजप-सेनेची युती नसल्याने भाजपचा मुख्यमंत्री झाला. मात्र, आता युतीचा मुख्यमंत्री होईल, अशी सावध प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.