शिवसेना प्रवेशावर एकनाथराव खडसेंचं स्पष्टीकरण…म्हणाले

0

मुंबई/जळगाव  : राज्यात देवेंद्र सरकार कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपशी नाराज असलेले खडसे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून महाआघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळवणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेच्या वाटेवरील चर्चा काहींना खऱ्या असल्याचं वाटत होतं. पण, याबाबत स्वत: खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय.

खडसेंनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. मी भाजपात असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं खडसे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचंही खडसे म्हणाले. पण, आपण भाजपातच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, देवेंद्र सरकार-2 कोसळताच खडसेंनी बुधवारी पक्षाला घरचा आहेर दिला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापल्यानं त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकल्याचंही खडसेंनी सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.