शिवसेना पक्ष संघटना मजबूत करणे हाच आपला ध्येय असायला पाहिजे : सुनिल पाटील

0

पाचोरा | प्रतिनिधी 

शिवतीर्थ शिवसेना कार्यालय येथे पाचोरा-भडगाव  तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न .

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दिनकर देवरे यांनी केले. या बैठकीत अध्यक्षीय भाषणात सुनील पाटील यांनी सांगितले की, आपण बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहात तुम्हा सर्वांच्या सहकार्याने भगवा महाराष्ट्रात डौलत आहे २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याकरिता शिवसेना पक्ष संघटना मजबूत उभारणीसाठी आपण आपल्या गावपातळीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पुरुष सदस्य नोंदणी पूर्ण करा. माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या कार्यक्रमांअतर्गत गाव तेथे शाखा घर तेथे शिवसेनीक निर्माण करा. गावाच्या दर्शनीय भागावर बोर्ड लावा, शालेय महाविद्यालयीन मुले-मुली, शेतकरी, व्यापारी मजूर, यांच्या समस्या दूरकरा, आपल्या मतदारसंघात आमदार नगराध्यक्ष जि. प. सदस्य यांनी केलेले विकास कामे नागरिकांपर्यंत पोहोचावा. विकास कामांची व शिवसेनेच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक , मिडिया, व्हाट्सअप, फेसबुक यावर प्रसिद्ध करा, ही सर्व कामे गावपातळीवर जबाबदारीने पूर्ण करावी शिवसेना पक्ष संघटना मजबूत करणे हाच आपला ध्येय असायला पाहिजे. यावेळी अॅड. दिनकर देवरे, गणेश पाटील, किशोर बारावकर ,बंडू चौधरी, शरद पाटील, डॉ. भरत पाटील, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, अविनाश कुडे, उपनगराध्यक्ष शरद पाटे, हिरालाल पाटील, विनोद पाटील, दिनकर चित्ते, भगवान राठोड, गोपाल परदेशी, राजेंद्र गीते, भरत खंडेलवाल, पपु राजपूत, मल्हारी पाटील, संदीप पाटील, अनिकेत सूर्यवंशी, वैभव राजपूत,अण्णा चौधरी, बाप्पू हटकर दिगंबर माळी, नाना वाघ, ज्ञानेश्वर पाटील, परशुराम पाटील अरुण मिस्तरी, मुकेश चौधरी, बाजीराव गीते, शांताराम वाघ, अमरसिंग परदेसी, शंभो परदेशी, स्विय सहायक राजेश पाटील, नितिन पाटील , विजय भोई, उपजिल्हा संघटिका सुनीता ताई पाटील मंदाताई पाटील, सुनंदा महाजन, किरणताई पाटील, उर्मिला शेळके, रत्‍नाबाई पाटील,बेबाबाई पाटील ,सुषमा पाटील ,पद्माताई पाटील, आरती शर्मा, शितल पाटील, सुनिता पाटील, स्मिता पाटील,अर्चना मिश्रा, विजया खैरे, सुनंदा पाटील, जया वाडेकर, गीता मोरे, प्रीती सोनवणे, करुणा चेडे ,वर्षा खैरनार, लताबाई वाघ, अनिता निंबाळकर, आशा हटकर, मिनाबाई तुपे, संगीता चौधरी, कल्‍पना पाटील, नर्मदा मराठे, यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.