शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघांच्या आवाहनाला मित्रपरीवाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

धरणगाव (प्रतिनिधी) :महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मोठ्या संयमाने परीस्थिती हाताळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देतांना शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मोठा निधी जमा करण्याचे आश्वासन दिले आहे याचा पहिला टप्पा म्हणून वाघांनी २,५१,०००/_रु.मदत निधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे दिला तो त्यांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांचेकडे सुपूर्द केला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रावर आलेल्या कठीण समयी मदत करावी असं अनेकांना वाटत होते. आपली मदत कुणाजवळ, कशी पोहचवावी अशी चर्चाही सुरु होती. हा धागा पकडत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पुढाकार घेत साऱ्यांना एकत्र आणले. मदतीचं महत्त्व पटवून दिले आपला सहभाग असावा असे आवाहन केले. याला प्रतिसाद म्हणून शहरातील व्यापारी, शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि मित्रपरीवार यांनी उत्स्फूर्त मदत देवू केली. आणि मोठा निधी जमा झाला.

हा निधी ना.गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री) याचां हस्ते प्रांताधिकारी श्री गोसावी व तहसिलदार नितीनकुमार देवरे धरणगाव यांचेकडे सुपूर्द केला.  गुलाबराव पाटील ५१००० रु , नगराध्यक्ष व शिवसेना नगरसेवक  ५१००० रु , शिवसेना मित्रपरिवार १ लाख  असे एकूण २ लाख रुपयांचा चेक शिवसेना शाखा धरणगाव व मित्र परिवार यांचे कडुन देण्यात आला.

लग्नात बचत पैसा मुख्यमंत्री निधीला
येथील माळी समाजाचे सचिव दशरथ झेडु महाजन यांच्या मुलीचा लाॅकडाऊनमुळे लाॅकडोअर लग्न झाले होते त्या निमित्त सामाजिक बांधिलकी ठेवुन ११०००/रु चेक, धरणगाव मधिल दानशूर व्यक्ती, धानोराचे सरपंच भगवान  आसाराम महाजन ११०००/,रु चेक, तसेच कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे  ११०००/चेक यांचा समावेश आहे.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, कार्यअध्यक्ष चर्मकार महासंघ भानुदास विसावे, उप तालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे -नगरसेवक   गटनेते पप्पु भावे, अहमद पठाण, विलास महाजन , विजय महाजन, जितेंद्र धनगर, नंदू पाटील, , शिवसेनेचे पदाधिकारी संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, रवी जाधव, विलास पुंडलिक महाजन, बालु जाधव, कमलेश बोरसे, मोहन महाजन, राहूल रोकडे,बुट्या  पाटील, रविंद्र कंखरे , पापा वाघरे, सतिश बोरसे, विनोद रोकडे, सद्दाम शेख, अरविंद चौधरी, गोलु चौधरी,  आदी उपस्थित होते.

चिमुरडीनेही दिली खाऊची रक्कम

कल्याणे-होळ येथील डॉ.आर.आर.पाटील यांची नात व धरणगाव येथील आराधना हॉस्पिटलचे डॉ.धीरज पाटील यांची मुलगी कु.आराधना या चिमुकली ने आपल्या खाऊसाठी जमवलेले पैसे खर्च न करता कोविळ -१९ ला पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ११,००० रुपयांची मदत जिल्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द करून कौतुकास्पद कार्य करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला.

लोहारांनी उत्तरकार्याचा खर्च सहाय्यता निधीला

दिनेश लोहार यांचे वडील एरंडोलचे माजी नगराध्यक्ष भिका लोहार यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या उत्तरकार्य टाळून तो खर्च त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोहार यांनी २१०००/- या निधीसाठी दिले आहेत.

असा जवळ पास 251000/रु निधी पालकमंत्री मा गुलाबरावजी पाटील याचा हस्ते प्रांताधिकारी गोसावी साहेब व तहसिलदार देवरे, प्रथमेश मोहोळ निवासी नायब तहसीलदार यांना देण्यात आला, या कामी शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी तसेच मित्र परिवार यांची मदत महत्वपूर्ण ठरली म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी दात्याचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.