शिवजयंतीला रणरागिणीने रोमियोला बसमध्येच दिला चोप

0
जळगाव-एरंडोल बसमध्ये घडला प्रकार : एमआयडीसी ठाण्यात आणली बस
जळगाव, दि.१९ – शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढत असलेल्या रोमियोला तरुणींनी बसमध्येच चांगला  चोप दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. दरम्यान, विद्यार्थिनींनी बस थेट एमआयडीसी पोलिसात नेत तक्रार दाखल केली आहे.
नूतन मराठा महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेली तरुणी तिच्या  बहिणीसह बुधवारी जळगाव-एरंडोल बस क्रमांक एमएच.२०.बीएल.२६५१ ने म्हसावद येथे जात होती. बसमध्ये बसलेला शब्बीर शाह भुरा शाह हा तरुणीचा काही दिवसापासून छेड काढत होता. त्यामुळे  तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता तरुणींनी त्याला चोप दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.