वरणगाव :- छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त अमाप खर्चास बगल देत आचेगाव येथे विद्यार्थ्याना शालेय भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत सानिका पाटील बहुउद्देशिय संस्थाच्या वतीन येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थाना अध्यक्षा पर्वताबाई पाटील, दत्तायत्र पाटील, किरण पाटील, पुडलीक पाटील निखील पाटील आकाश पाटील शाळेच्या मुख्याध्याक रोहिणी पवार, अतुल पाटील यांचा प्रमुख उपस्थीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यात विद्यार्थ्याना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सील इत्यादी वाटप करून या परिसरात छत्रपती शिवाजी जयंतीला डि जे वाजत्री वर होणारा खर्च टाळून विद्यार्थाना वस्तु वाटप करुण या निमीत सस्थेचा एक नविन आदर्श पाहवयास मिळाला आहे.