मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन ला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले. या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २००८ ते २०१५ पर्यंत कवी राम कदम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. परंतु सन २०१५ पासून या फाऊंडेशनचे नामकरण शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन असे करण्यात आले. तेव्हा पासून सुद्धा अनेक शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व कला क्षेत्रातील उपक्रम उज्जैनकर या फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी राबवित असतात त्यामध्ये कविसंमेलन ८ मे २०१० ला ४६ वे अंकुर मराठी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे कुरा काकोडा या ग्रामीण भागात आयोजन करून यशस्वी केले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, विद्यार्थ्यांसाठी मोबाईल द्वारा साहित्य संदेश हा सुद्दा बहुचर्चित उपक्रम त्यांनी राबवला आहे तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार वितरण सोहळा, सुशिक्षित बेरोजगार मेळावा , शेतीला पूरक उद्योग म्हणून गावरान कोंबडीचे कुक्कुटपालन मेळावा ,ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर यांच्या लावण्याची चंद्रकोर या कादंबरीवर चंद्रकोर नावाचा चित्रपट सुद्धा उज्जैनकर सर यांच्या सहकार्याने २०१५ मध्ये प्रदर्शित झाला मुक्ताईनगर तालुक्याच्या इतिहासात ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल, विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांसाठी जनरल आरोग्य तपासणी शिबिर, विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून २७६ रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या माध्यमातून केलेले आहेत. तसेच ६ व ७ जून २०१९ ला ५७ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे मुक्ताईनगर येथे आयोजन करून यशस्वी सुद्धा केले, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच गोवा, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातून सुद्धा नामवंत साहित्यिकांनी आतापर्यंत उज्जैनकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिलेली आहे. वृक्ष लागवड,विद्यार्थ्यांसाठी कवी, लेखक, साहित्यिक व विचारवंत आपल्या विद्यालय व महाविद्यालयात या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर तालुक्यातील विविध विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उज्जैनकर यांनी या फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी साहित्यिक व समाजोपयोगी उपक्रम त्यांनी वेळोवेळी राबवले आहेत आतापर्यंत तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या सातशेच्या वर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे तसेच कोरोनाविषाणू लॉक डाऊन
च्या काळामध्ये सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना योद्धा गौरव प्रमाणपत्राचे ऑनलाईन वाटप राज्यातील 866 मान्यवरांना प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे क ए व्ही जी फिल्म प्रोडक्शन व आनंदी गुरुकुल एक्टिंग अकॅडमी अकोला व फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 26 नामवंत व्यक्तींना,
मान्यवरांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमंत्रित करून विविध विषयावर मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच राज्यातील दोनशेच्यावर साहित्यिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवले आहे.
मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम साहित्यिकांसाठी विविध उपक्रम व समाजपयोगी विविध कार्यासाठी नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनला आय एस ओ ९००१ ; २०१५ मानांकन प्रमाणपत्र नुकतेच उज्जैनकर यांना प्राप्त झाले त्याबद्दल उज्जैनकर सरांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या कार्यासाठी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य मंडळी उज्जैनकर यांना वेळोवेळी सहकार्य करतात असेही ते प्रसंगी म्हणाले.
