माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन
कोपरगाव– सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान सांई झुलेलाल यांचे भव्य मंदिर शिर्डी येथे साकारणार आहे. या मंदिराचे भुमिपुजन आज झाले.
सिंधी समाज सांई झुलेलाल ट्रस्ट, शिर्डी संस्थानतर्फे शिर्डी येथे भव्य श्री सांई झुलेलाल मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. गुरुवार दि.१९ रोजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला.या प्रसंगी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी राज्यमंत्री (द) डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या प्रमुख उपस्थिती
मध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.