शिरूड विकास मंचचा आणखी एक विधायक उपक्रम

0

अमळनेर:- शिरूड विकास मंचचे कार्यकारी सदस्य ,शिरूडकर बडोदा निवासी पद्माकर गुलाबराव पाटील यांनी आपले वडील स्व.गुलाबराव पितांबर पाटील यांच्या निधनानंतर दशक्रियाविधी व उत्तरकार्य कार्यक्रमात अन्नदानावर जास्तीचा अनाठायी खर्च न करता ज्ञानदानास मदत व्हावी म्हणून जि प प्राथमिक शाळा शिरूडच्या गुणवत्ता वाढीसाठी देणगी रु 21000रुपये शिक्षक श्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देऊ केलीआहे तसेच दत्तमंदिर साठी 5000 रु देणगी दिली आहे. याआधी देखील अशा देणग्या प्राप्त झाल्या असून देणगीदारांच्या आई वडील आजोबा यांच्या प्रतिमा शाळेत जतन केल्या जात आहेत.स्व.गुलाबराव आबांचा फोटो शाळेत कायमस्वरूपी लावला जाणार आहे.

गोरगरीब मुलांना आंतरराष्टीय दर्जाचे शिक्षण आपल्या शाळेत मिळावे यासाठी संपूर्ण गावात गेल्या काही वर्षांपासून गावकरी विविध निमित्ताने सर्वतोपरी मदत करत आहेत माजी विदयार्थी मेळावा ,प्रेरणा सभा ,गल्ली मीटिंग ,पालक सभा,मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला देणगी देणे अशा उपक्रमातून शाळेला रोख व वस्तूस्वरूपात सुमारे 7 लाखाची मदत प्राप्त झाली आहे.

या मदतीमुळे शाळा 100 % डिजिटल ,ABL , इमारतीस डिजिटल पेंटींग,शाळा दुरुस्ती,शाळेची परसबाग वृक्षसंवर्धन, इलेक्ट्रिक व प्लम्बिंगकाम फर्निचर,एल सी बुक लॅमीनेशन, थोर नेते फोटो, वॉटर फिल्टर शौचालय दुरुस्ती, संगणक दुरुस्ती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासारखे विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासास पूरक उपक्रमासाठी मदत झाली.शासनाने व स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांच्या प्रयत्नाने देखील नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र ,interactiv board & projecter आपल्या शाळेला दिले असून मोठी इमारत दुरुस्ती व शाळेचे वाल कंपाउंडचे मोठे काम सुरू आहे. गाव करी ते राव काय करी या उक्तीप्रमाणे गावात सर्व पक्षभेद न ठेवता सर्व गावकरी पदाधिकारी एकजुटीने शिरूड विकास मंच अंतर्गत काम करत आहेत.

आजच्या या प्रसंगी शिरूड विकास मंचचे कार्यकारी सदस्य श्री प्रा. सुभाष जीभाऊ,श्री श्याम बापू,श्री जयवंतराव नाना,सरपंच श्री सुपडू पाटील,पोलिस पाटील विश्वास महाजन,श्री महेंद्र पाटील,श्री प्रफुल्ल पंडित पाटील, श्री मनोज भाईदास पाटील ,श्री शरद कुलकर्णी , श्री मिलिंद पाटील,श्री रवींद्र धनगर यांनी या मदतीसाठी प्रोत्साहित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.