शिरूड ता अमळनेर : रजनीकांत पाटील प्रतिनिधी
सध्या कोरोना चा हाहाकार सर्वदूर उडालेला आपण बघत आहोत. अशा आपात्कालीन परिस्थितीत माजी आमदार स्मिताताई वाघ या शिरुडकरांच्या मदतीला धावून आल्या. कोरोना आपण थोपवू शकत नाही, परंतु काही काळजी घेतली तर त्याला आळा बसू शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे. प्रत्येक नागरिक मास्क वापरणे, सोशल अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे हे सर्व करत असतो पण गावगाड्यात सार्वजनिक निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत च्या वतीने वारंवार होताना दिसत नाही. या कोरोना काळात हे निर्जंतुकीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. नेमकी हीच गोष्ट माजी आमदार स्मिताताई वाघ व भैरवी ताई पालांडे वाघ हे स्मितोदय फाऊंडेशनच्या वतीने करतांना दिसून येत आहे. असेच गाव निर्जंतुकीकरण करण्याचे काम शिरूड येथे माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या सौजन्याने झाले.
गाव निर्जंतुकीकरण करण्याचा कार्यक्रम नारळ वाढवून झाला. यावेळी सरपंच गोविंदा सोनवणे, गुलाब मोरे, शशिकांत पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील,कल्पेश महाजन, राजेश वाघ, वसंत पाटील, यशवंत बैसाणे, राहुल चौधरी भालेराव पाटील व गावातील अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी अप्रत्यक्षपणे श्री डी ए धनगर सर यांची मदत झाली. दिवसभर चाललेल्या या फवारणी दरम्यान गावकऱ्यांनी माजी आमदार स्मिताताई वाघ यांचे मनोमन आभार मानले. अशा संकटकाळी सुद्धा ताई मोठा मनाने गावाला मदत केली हे कदापि विसरू शकणार नाही असे गौरवोद्गार काही वयोवृद्ध व जाणकार नागरिकांनी काढले.