Thursday, February 2, 2023

शिरसोली येथे 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरसोली येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

जगदीश प्रल्हाद पाटील (वय 32 रा. भोद ता.धरणगाव ह.मु. शिरसोली ता. जि. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.  नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शिरसोली येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्याला होते. पत्नी ८ दिवसांपासून माहेरी  गेल्याने ते घरी एकटीच होते. काल सोमवारी रात्री  राहत्या घरात साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही बाब आज दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकिला आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सकाळी त्यांची बहीण सुनंदा शांताराम पाटील हे त्यांना उठवण्यासाठी गेले परंतु, भाऊ झोपला असेल या विचाराने त्या तेथून शेतात कामाला निघून गेले. दुपारी २ वाजता घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा दरवाजा बंद दिसला त्यामुळे त्यांना शंका निर्माण झाली. त्यांनी तातडीने नातेवाइकांना बोलून दरवाजा उघडला तर भावाने राहत्या घरात साडीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. भावाचा मृतदेह पाहून बहिणीने हंबरडा फोडला होता. याप्रकरणी तातडीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयत जगदीश पाटील यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, मुलगी जानू, मुलगा राज, दोन भाऊ असा असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे