शिरसोलीसह परिसरातील गावांसाठी गिरणेचे आवर्तन सोडा

0

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची निवेदनाद्वारे मागणी

जळगाव;- पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई लक्षात घेता गिरणा धरणातून गिरणा नदिपात्रात सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन शिरसोली सह परिसरातील गावांसाठी दापोऱ्या बांधाऱ्या पंर्यत सोडावे. अशा मागणीचे निवेदन मा. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माने यांना आज सकाळी दिले.

निवेदनात म्हटले आहे कि , गिरणा नदिपात्रातील दापोरा बांधाऱ्यावरून सध्या शिरसोली प्र.न., शिरसोली प्र. बो. , दापोरा , दापोरी , खर्ची , लमांजन, रवंजे बु. खुर्द व रिंगणगाव गावांच्या सांर्व जनिक पाणी पुरवठा योजना आहेत . सध्या स्थितीत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे या सर्व गावांना दहा ते पंधरा दिवसात पाणीपुरवठा होत आहे . यात शिरसोली प्र . बो. व प्र.न. या दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे तीस हजारां पंर्यत आहे . तेथिल नागरीकांना पाण्यासाठी संध्या वणवण भटकावे लागत आहे . दापोऱ्या बांधाऱ्या पंर्यत हे आवर्तन आल्यास त्या काठावरील गावांच्या पाणीप्रश्न सुटेल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . यावेळी अभियंता श्री. माने दापोऱ्या बंधाऱ्यापर्यत आवर्तन सोडण्याबाबत अश्वासन दिले .

———–यांची होती उपस्थिती —————-
दर्या सागर संस्थेचे अंध्यक्ष भगवान सपकाळे , शिरसोली प्र.न. चे सरपंच हरि बोबडे , शिरसोली प्र. बो. चे सरपंच रामभाऊ भिल , प्रदिप रावसाहेब पाटील , अॅड. विजय काटोले , दापोरीचे सरपंच निलेश पाटील , माजी सरपंच गोविंद तांदळे , संतोष पानगळे , अशोक साठे , समाधान निकुंभ , अरूण सोनवणे , संतोष राक्षे, उज्वल पाटील सह बहुसंख्य ग्रांमस्थ उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.