शिरसाड येथील तेजस पाटील यांना विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार

0

साकळी ता.यावल : शिरसाड  येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते तसेच यावल खरेदी विक्री संघाचे संचालक  तेजस पाटील यांना संस्कृती फाउंडेशन भुसावळ यांच्यावतीने नुकताच विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार अमेरिकेतील प्रिस्टोन विद्यापीठातील समाजसेवी युवती अनाम वडगामा यांच्या हस्ते देण्यात आला. संपुर्ण भारतातून ४० युवकांना हा पुरस्कार देण्यात आला. तेजस पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाची ही पावती त्यांना मिळाली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम तेजस पाटील यांनी राबवून समाजापुढे व तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यापुढे तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात तसेच शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा इत्यादी अनेक सामाजिक विषयांवर काम करण्याचा तेजस पाटील यांचा मानस आहे. कार्यक्रमात यावेळी खा.रक्षा खडसे, भुसावळचे आ.संजय सावकारे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद डागर, शांतिवन प्रकल्पाचे सर्वेसर्वा व  सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे, एस. एस. जी.  बी. अभियांत्रिकी कॉलेज चे प्राचार्य डॉ.आर.पी. सिह तसेच संस्कृती फाऊंडेशन चे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तेजस पाटील यांना पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.