Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शितल आर्टच्या प्रशिक्षणार्थींनी रांगोळीतून साकारली मातेची कलाकृती
    जळगाव जिल्हा

    शितल आर्टच्या प्रशिक्षणार्थींनी रांगोळीतून साकारली मातेची कलाकृती

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 8, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     पाचोरा | प्रतिनिधी
    “भारतीय उत्सव परंपरा आणि धार्मिक वारसा जपणारे अनेक उत्सव ही परंपरा जपतांना साजरे केले जातात. अशाच प्रकारच्या धार्मिक वारसा आणि भक्ति भावना मनात जागरूक ठेवणारा उत्सव म्हणजे नवरात्री, नऊ दिवस देवीची पूजा करून आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे पाचोरा येथील “शितल आर्ट क्लासेस” हे आहे. शितल आर्टच्या माध्यमातून नेहमीच उत्कृष्ट अशा कलाकृतींचे दर्शन शहरासह परिसरातील नागरिकांना बघावयास मिळत असते. सद्यस्थितीत सर्वत्र नवरात्रीची धुम धाम असुन नवरात्रीनिमित्त पाचोरा येथील शितल आर्टच्या मार्गदर्शिका तथा संचालिका शीतल निशिकांत पाटील आणि त्यांचे सहकारी कु. स्नेहल जैन, कु. प्रांजल जैन, कु. निकिता मराठे, कु. अनुष्का पाटील, योगिता पाटील, अश्विनी पाटील, अमृता पाटील यांनी नवरात्री उत्सवानिमित्त डोळ्यांचे पारणे फिटेल अशी देवीची रांगोळी साकारली आहे.
    ही रांगोळी साकारण्यासाठी शितल पाटील व त्यांच्या महिला सहकाऱ्यांना तब्बल २५ तासाचा वेळ लागला असुन लेक व पिग्मेण्ट रंगाचा वापर या कलाकृतीला साकारण्यासाठी  करण्यात आला आहे. यासाठी त्यांना ९ किलो रांगोळी लागली असुन शहरासह परिसरातील भाविक भक्तांसाठी या अतुलनीय रांगोळी बघण्यासाठी दि. ८ ऑक्टोबर पासून दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत ही अनोखी कलाकृती शहरातील नवकार प्लाझा येथील गाळा क्रं. ५७ येथे निःशुल्क बघावयास मिळणार आहे. या कलाकृतीचे दर्शन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शितल आर्टच्या संचालिका शितल पाटील सह त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी केले आहे. तसेच शितल पाटील व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी साकारलेल्या या अद्भभुत कलेचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.\

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif