जळगाव (प्रतिनिधी) : शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना ३० एप्रिल पर्यंत वर्क फ्रार्म होमची मुभा मिळावी यासाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांची प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
त्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांचे आदेश क्र.दंडप्र-01/कावि/2021/685दि.14/04/2021 या पत्राद्वारे तसेच शासन आदेश दि.13/04/2021मध्ये दिलेल्या ब्रेक द चेन बाबतच्या निर्देशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरिता मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी 14 एप्रिल ते 01मे 2021 पर्यत संचारबंदी लावलेली आहे, तसेच फौंजदारी संहिता1973चे कलम144 लागू झालेले आहे.संचारबंदी कालावधीत शाळा बंद आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना रुग्ण संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संचार बंदी कालावधीत शाळेत येण्याची आवश्यकता नसल्याने दि.30/04/2021पर्यत वर्क फ्रार्म होमचे आदेश देण्यात यावे असे पत्रात नमूद केलेले आहे.