शिक्षक मारहाणीचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध

0

भुसावळ –
: येथील डि.एल.हिंदी विद्यालयात काही टवाळखोरांनी शिक्षकांना मारहाण केली होती. या घटनेचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध करण्यात आला. तसेच यातील आरोपींवर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. दि. 18 रोजी कॉपी करु न दिल्याचा राग येऊन परीक्षा संपल्यानंतर डी.एल. हिंदी हायस्कूलच्या महिला शिक्षीका व इतर शिक्षकांना मारहाण करण्यात आली.त्यामुळे दहावी आणि बारावीच्या कालखंडात शाळेला पोलिस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी विभागीय मंत्री कैलास गायकवाड, प्रांत सत्संग सहप्रमुख नारायण घोडके, जिल्हा मंत्री योगेंद्र हरणे, बजरंग दल जिल्हा संयोजक गोपिसिंग राजपूत, ऋषभ जैन, राकेश शर्मा, प्रकाश चौधरी, जिल्हा सहमंत्री विनोद उबाळे, शरद तायडे, गणेश पाटील, अमोल सोनार, शुभम सोनार, सोनू मांडे, विजय घोरपडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.