पारोळा,दि. 5-
सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभागाचा राज्य आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण समारंभात धाबे जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव भिमराव साळुंखे यांना ना. विनोद तावडे,मंत्री शालेय शिक्षण क्रीडा विभाग,आदेश बांदेकर राज्यमंत्री अध्यक्ष सिद्धी विनायक संस्थान, ना. महादेव जानकर राज्य मंत्री पशु संर्वधन यांच्याहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष जलसंपदा राज्यमंत्री,सातार्याचे पालकमंत्री ना. विजयबापू शिवतारे, व महसुल मंत्री ना. चंद्रकांत पाटील मंत्री,ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती विधान परिषद,ना. सदाभाऊ खोत राज्यमंत्री,कृषी तथा सहपालक मंत्री सातारा जिल्हा यांच्या विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी खा. विजयसिंह मोहिते पाटील, खा. उदयनराजे भोसले, ना. संजीवराजे नाईक-निंबाळकर अध्यक्ष,जिल्हा परिषद सातारा, आ. आनंदराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शंभुराजे देसाई, आ. दिपक चव्हाण,आ. नरेंद्र पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण,आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मोहनराव कदम,आ. दत्तात्रय सावंत, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, वंदना कदम अप्पर मुख्य सचिव,शालेय शिक्षण,विशाल सोळंकी आयुक्त शिक्षण,यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजक गंगाधर म्हमाणे शिक्षण संचालक माध्य. पुणे, सुनिल चौहान, शिक्षण संचालक प्राथमिक पुणे, किरण लोहार विभागीय शिक्षण उप संचालक कोल्हापूर विभाग,श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा, डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिप सातारा, राजेश पवार सभापती, शिक्षण जिप सातारा हे होते.अतिशय देखणा, शिस्तबद्ध, सुंदर नियोजनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्याध्यापक साळुंखे यांना या पुरस्कारात सन्मान पत्र, सन्मान चिन्ह व एक लाख दहा हजार रुपये असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवास खर्च, दोन दिवस पुस्तकाचे गांव भिलार महाबळेश्वर येथे मोफत निवास भोजन, संगीत कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले होते. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कारार्थींमध्ये येवुन संवाद साधला.
कार्यक्रमाच्या दरम्यान मराठी कलाकार आदेश बांदेकर, भरत जाधव यांची पुष्कर श्रोत्री यांनी शिक्षक व शिक्षकांची भूमिका,त्यांचे शालेय जीवन या बाबत चर्चा व मुलाखत घेतली.

