शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा ; अन्यथा १७ पासून आंदोलन

1

भुसावळ : डॉ.के.पी.बक्षी समितीच्या शिपारशीनुसार राज्यातील सर्व विभागांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. परंतु राज्यातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अद्यापही वेतन आयोग लागू न झाल्यामुळे तमाम शिक्षकेतर कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झालेला आहे.

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची सभा दि.२९ जून रोजी प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी पुणे पार पडली. यात  दि. १७ जुलै २०१९ पर्यंत महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू न झाल्यास महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी दि. १९ जुलै  रोजी राज्यातील सर्व सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयासमोर शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन. दि.२२ रोजी  रोजी उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन. दि.१ ऑगष्ट  रोजी महाविद्यालयात १ दिवसाचा लाक्षणिक संप. महासंघाने चौथ्या वेतन आयोगापासून वेळोवेळी वेतनत्रुटीच्या मागण्या केलेल्या असून आजपर्यंत कुठेही शासन स्तरावर दखल घेतली गेली नाही व घेण्यात येईल. असे वाटत नाही म्हणून दि.९ ऑगष्ट रोजी महासंघ प्रतिनिधीनी  मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचे  बैठकित निर्णय घेण्यात आला असून शासनाला तसा इशारा दिला आहे. ती महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग (वेतन त्रुटी सह) व सेवांतर्गत आश्वाशित प्रगती योजना लागू करावी याची नोंद शासन दरबारी घ्यावी असे आवाहन  भुसावळ तालुक्यातील शिक्षक सघटनेचे पदाधिकारी आविनाश पाटील, अतुल शेटे, गिरीश अवस्थी, रेवानंद झांबरे यांच्यासह पदाधिकरी यांनी केले आहे.

1 Comment
  1. Kailas puskar says

    अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे अजुनही सातवा वेतन याबाबत पाठपुरावा करून
    बातमी तातकाल द्यावी हि नम्र विनंती

Leave A Reply

Your email address will not be published.