जळगाव;- शिक्षकांचे विविध समस्या,प्रश्न आणि त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आपण उमेदवारी जाहीर केली असून येत्या दोन ते तीन दिवसात कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची याचा निर्णय जाहीर करणार अशी माहिती विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार किशोर दराडे यांनी आज पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
यापुढे बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले कि , नाशिक जिल्ह्यात एकूण १४ हजार पाचशे मतदार असून संपूर्ण मतदार संघात मिळून ५५ हजार ३०० मतदार आहेत . नाशिक जिल्ह्यातून केवळ मीच एकमेव उमेदवार असून राष्ट्रवादी ,शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून विचारणा झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करू असेही त्यांनी यावेळी सांगितले . शिक्षकांच्या प्रश्नांवर आपण आवाज उठविणार असून त्यांना देण्यात येणारा तासिकांचा अतिरिक्त कारभार ,पेन्शन योजना , ७ वा वेतन आयोग यासह अन्य विषयांवर भूमिका मांडणार असल्याचे किशोर दराडे यांनी सांगितले .