अमळनेर | प्रतिनिधी
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या आधी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे व या सर्वेक्षणातून विकलांग, आजारी व्यक्तींना वगळण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण राबविले जाणार आहे. यासाठी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोविड सदृश्य रुग्ण सर्वेक्षण मोहीमेत सहभागी करून घ्यायचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत, याआधी शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले आहे त्यावेळी योग्य सुविधा न पुरवल्यामुळे अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली त्यात काही शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे शिक्षकांना लस देण्यात यावी कीट पुरविण्यात यावे तसेच आजारी व विकलांग व्यक्तींना या सर्वेक्षण कार्यातून वगळण्यात यावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ व सोमनाथ पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


