शिंदाड प्रार्थमिक शाळेत वृक्षारोपण

0

शिंदाड ता.पाचोरा | प्रतिनिधी 

येथील जि प प्राथमिक शाळेत दि २९ रोजी वृक्षारोपण करण्यात आले.  येथील शाळेत पिंपळगाव शिंदाड गटाचे जि प सदस्य मधुकर काटे ,सरपंच ज्ञानेश्वर तांबे,उपसरपंच नरेंद्र पाटील ,माजी सरपंच कैलास पाटील यांचे हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली यावेळी यावेळी मधुकर पाटील,नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त  करून वृक्ष संगोपन करण्यासाठी व शाळेत शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्वतो परी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.  यावेळी माजी उपसरपंच हिलाल पाटील,ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ,विलास पाटील,स्वप्नील पाटील,अकिल तडवी,समाधान पाटील,जनाबाई पाटील,कांचन परदेशी,इंदल परदेशी,धनराज पाटील,श्रीकांत पाटील,दशरथ पाटील,विजय पाटील,बापू पाटील,विनोद तडवी,मुख्याध्यापक मीना नेहरकर,प्रशांत पाटील,जितेंद्र जगताप,विजय पाटील,विनोद महालपुरे,दीपक साळुंखे,निलेश देशमुख ,संगीता पाटील,यामिनी पाटील,सरला वाघ,शेख सर  आदी उपस्तीत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.