शाहीर हरीभाऊ खैरनार यांचे निधन

0

जळगाव ः बळिराम पेठेतील रहिवासी तसेच जुन्या काळातील शाहीरीला योगदान देणारे स्व:शाहीर हरी विठ्ठल खैरनार (खैरनार टेलर्स) (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने सकाळी निधन झाले. लगेच एका तासाच्या अंतराने हरी विठ्ठल खैरनार यांचे लहान बंधू केशव विठ्ठल खैरनार (वय 81) यांचे भावाच्या मृत्युच्या धक्‍याने निधन झाले.

शाहीर म्हणून प्रभावी कार्य करणाऱ्या हरी खैरनार यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री तथा 
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्या खैरनार यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाच्या जनजागृती मोहिमेत त्यांनी वेळोवेळी सहभाग घेवून प्रचार व प्रसार कार्याला त्यांनी हातभार लावला होता. दोघेही जळगाव शहरातील प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट आर.एन. खैरनार यांचे काका होते तर कैलास खैरनार, भूषण खैरनार यांचे वडील होते.

शाहीर संघटनेसाठी हरीभाऊंचे मोलाचे कार्य 
शाहीर संघटनेचे पदाधिकारी म्हणून हरी खैरनार हे कार्यरत होते. शाहीर बांधवांच्या प्रश्‍नांना त्यांना वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्न केले. तसेच हाडाचे कलावंत म्हणून तळमळीने त्यांनी त्यांचे कार्य अबाधित ठेवले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांनी प्रकृती अभावी कार्य थांबविले होते. तसेच ते दुर्गादेवी मंदिर व कीर्तन कार्यक्रमात ते सक्रिय राहत असे. 

Leave A Reply

Your email address will not be published.