शाहरुखला लंडनमधील विद्यापीठाकडून मिळाली पदवी

0

लंडन :- लंडनमधल्या विद्यापीठाने बॉलिवूड अभिनेता शाहरूखला मानद पदवी देऊन गौरवले आहे. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’कडून त्याला लोककल्याण विषयातील पदवी प्रदान करण्यात आली. साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा दीक्षांतसोहळा पार पडला.

शाहरूखनं मानवी हक्क, न्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानं या कार्यात मोलाचं योगदान दिलं म्हणूनच लोककल्याण विषयातील पदवी अभिनेता, निर्माता शाहरूखला आम्ही प्रदान करत असल्याचं विद्यापीठानं ट्विट करत म्हटलं आहे. शाहरूखनं ही पदवी स्वीकारली आहे.

दरम्यान, शाहरूखनं आपल्या पदवी दानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामुळे निस्वार्थी मदत करण्यासाठी मला प्रेरणा मिळेल असं शाहरूखनं ट्विट करत म्हटलं आहे. यापूर्वी शाहरूखला ‘द युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग’ आणि ‘द युनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायर’कडून मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.