Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा – खा. रक्षा खडसे
    जळगाव

    शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा – खा. रक्षा खडसे

    By July 1, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर :- पाचोरा जामनेर रेल्वे मार्ग बोदवडपर्यत करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्याने तालुक्यात देखील त्यांना जास्त वेळ देता येत नाही,त्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाळावी.केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांनी शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात आयोजीत पक्षाच्या तालुका विस्तृत बैठकीत केले.

    यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन,जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे,जिल्हाउपाध्यक्ष गोविंद अग्रवाल,डॉ.मिलिंद वायकडे,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,जितू पाटील,अॅड.शिवाजी सोनार,छगन झाल्टे,न.प.गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, उपनगराध्यक्ष अनिस शेख,जिल्हा परिषदेच्या सदस्या विद्या खोडपे,सुनीता पाटील,पंचायत समितीच्या सभापती निता पाटील,नगरसेवक बाबुराव हिवराळे, महेंद्र बाविस्कर,अतिष झाल्टे,प्रमोद वाघ,सुधाकर माळी,सुहास पाटील,नाजीम शेख,खलील शेख,विलास पाटील,अमित देशमुख,रामेश्वर पाटील,नाना वाणी, सुरेश बोरसे,रामण चौधरी,गोपाल नाईक,संजय देशमुख,बाबुराव घोंगडे आदी उपस्थित होते.खा.रक्षा खडसे म्हणाल्या की ना.महाजन यांनी प्रत्येक गावासाठी काम केले आहे.सर्व सामान्य लोकांच्ये काम त्यांनी केले आहे.त्यासाठी आता विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने कार्यकर्त्यांनी स्वतः जबाबदारी स्विकारुन काम केले पाहिजे.भारतीय जनता पार्टीला मजबूत करणे आपले काम आहे संघटन मजबूत असले की जास्तीत जास्त जागेवर आपण निवडून येतो.असा सुचक इशारा त्यांनी दिला.

    यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी लोकसभेत तालुक्यात खा.रक्षा खडसे यांना कोणत्या गावातून कोणत्या बुथ वरून किती मतदान मिळाले याची सविस्तर माहिती दिली.तसेच विधानसभा निवडणूका जवळ आल्याने पक्षाने आखलेल्या कामांची सविस्तर माहिती व तालुकाभारातील बैठकीचे नियोजन या वेळी करण्यात आले.

    तसेच प्रा.सुनील नेवे,महेंद्र बाविस्कर,गोविंद अग्रवाल यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवलसिंग पाटील यांनी तर सुत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif