जळगाव : शासनाने महिनाभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांसाठी लॉकडाऊन घोषित केल्याने, या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मधून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे शासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्या बाबत राज्यभरातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याचे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. विजय काबरा व सचिव ललीतकुमार बरडिया यांनी केले आहे.
मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊन मधून कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न व्यापारी करत आहेत. शासनाला सर्व स्तरावर सहकार्य करत असताना, लागू करण्यात आलेला लॉकडाऊन प्रचंड संताप व रोष वाढविणारा आहे. याचा तीव्र शब्दात निषेध करून, याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्र पाठविताना संघटनेचे नाव, गावाचे नाव, पत्ता पाठवून व्यापाऱ्यांनी आपली एकजूट दाखविण्याचे आवाहनही केले आहे.