शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी भरवली पंचायत समितीत शाळा

0

जामनेर : तालुक्यातील ढालगाव येथील उर्दू शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना माघारी परतावे लागले. घडलेल्या या प्रकारानंतर आज (मंगवारी) शाळेतील विद्यार्थ्यांनी जामनेर पंचायत समितीमध्ये जाऊन तेथेच शाळा भरविली.

ढालगाव येथील उर्दू शाळेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पर्यायी शिक्षक हजर झाले नाही. परिणामी १७ जूनला पहिल्या दिवशी शाळा उघडलीच नाही. त्यामुळे विद्यार्थी घरी परतले. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवार, १८ जून रोजी सकाळी जामनेरला येऊन पंचायत समिती कार्यालयात आवारातच शाळा भरविली. विद्यार्थी दप्तरासह जमिनीवर बसल्याने रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी झाली. गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर यांनी तेथे भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.