शालिनी सोमकुवर सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

0

वढोदा : वढोदा जि प केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती  शालिनी सोमकुवर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व जिल्हा महिला शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक गटातून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला.

पुरस्काराचे वितरण आचार संहितेनंतर करण्यात येईल. या  पुरस्काराची घोषणा जिल्हाध्यक्ष विलास नेरकर,महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती अरुणा उदावंत,जिल्हाध्यक्ष डॉ पाकिजा पटेल, जिल्हाध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी केली.

श्रीमती शालिनी सोमकुवर यांचे शिक्षण क्षेत्रातील काम अतिशय प्रभावी व कृतिशील असे आहे. उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून त्या परिसरात परिचित आहे त्यांनी त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक नवोपक्रम राबविले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला. याबद्दल त्यांचे तालुक्यातून सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.