कजगाव ता.भडगाव : येथील इंद्रसिंग चंद्रसिंग पाटील यांच्या कजगाव शिवारातील विजवितरण कार्यालया लगत असलेल्या शेतात शार्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत तीन बिघ्यातील मका चार व ठिंबक सिंचन च्या नळ्या असा अडीच ते तीन लाख रुपयांचा माल जळुन खाक झाला शेता शेजारीच वीज वितरण चे सबस्टेशन असल्याने वीज प्रवाह च्या तारा या शेतातून गेल्या आहेत यात झालेल्या शॉर्टसर्किट मुळे आग लागुन अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले
बाबत वृत्त की येथील रहिवासी इंद्रसिंग चंद्रसिंग पाटील यांचे कजगाव शिवारात कजगाव भडगाव मार्गावरील विज वितरण च्या सब स्टेशन च्या बाजुला शेती आहे तीन बिघ्यातील मका कापुन थप्पा मारलेला होता मका काढणारे मशीन मिळाल्या नंतर मका काढायचे होते चारा मात्र उभाच होता दि.२७ च्या दुपारी शार्टसर्किट मुळे अचानक आग लागुन तीन बिघ्यातील मका कणसाचा थप्पा उभा चारा व तीन बिघे क्षेत्रातील पुर्ण ठिंबक च्या नळ्या जळून खाक झाल्या चारा व मका कोरडा असल्याने काहि मिनिटात सार जळुन खाक झाले या मुळे इंद्रसिंग पाटील यांचे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले या बाबत तलाठी कार्यालयात कळविण्यात आले आहे पंचनामा करण्यात येणार आहे