शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी राजीव कुमारांना दिलासा नाहीच

0

नवी दिल्ली :- शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे माजी आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील आज खंडपीठाने याप्रकरणावर सुनावणी केली.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सीबीआय आपलं काम करू शकतं. मात्र कोर्टाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका बसला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सात दिवसानंतर लागू होणार आहे. राजीव कुमार यांना जामीन मिळाला नाहीतर तपास यंत्रणा त्यांना अटक करू शकतात. या निर्णयामुळे प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांना दणका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.