रावेर पोलिस ठाण्याच्या कार्यालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणचे उद्घाटन
रावेर;- – रावेर पोलीस ठाण्याच्या नुतनिकरणासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य चांगले लाभले. हे अभिनंदनीय आहे. या प्रमाणेच परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेवटी शांतता आसेल तरच गावाची व पर्यायाने देशाची प्रगती साध्य होते. असे मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी रावेर पोलिस ठाण्याच्या कार्यालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे बोलत होते . या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, प्रांतधिकारी डाॅ. अजित थोरबोले, फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तर सुत्रसंचलन दिलीप वैद्य, दिपक नगरे यांनी केले.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सह मान्यवरांनी सर्वप्रथम रावेर पोलिस ठाण्याच्या कार्यालयाच्या नुतनीकरण व शुशोभिकरण कामाची पहाणी करून पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे व सर्व सहकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले. त्या बद्दल कौतुक केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षकांच्याहस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत शिस्तबद्द, उल्लेखनीय सहकार्य केल्याबद्दल सिद्धार्थ व्यायाम शाळा, भीमशक्ती लेझीम मंडळ स्टेशन, प्रशिक लेझीम मंडळ, तथागत फुले, आंबेडकर लेझीम मंडळ या मंडळाचे स्मृतीचिन्ह देवुन स्वागत करण्यात आले. तसेच पोलीस कर्मचारी विठ्ठल देशमुख, विनोद पाटील या पोलीस कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचे सत्कार करण्यात आला. येथील पत्रकार दिपक नगरे यांना अधिस्वीकृती मिळाल्याने व दिलीप वैद्य यांनी जागतिक कृषी प्रदर्शन इस्त्राईल येथे जावुन वृत्तांकन केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
———यांची होती उपस्थिती ——
कार्यक्रमास नगराध्यक्ष दारामोहम्मद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गनवाणी, ज्ञानेश्वर महाजन,
नगरसेवक प्रल्हादभाऊ महाजन, शे.सादिक, असदुल्ला खाॅ. पं. स.सदस्य पि.के.महाजन, वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, शे.गयास, युसूफ खान, डाॅ. एस.आर.पाटील, बाळू शिरतुरे, शिरीष वाणी, योगेश गजरे, अॅड. एम.ए.खान, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, महेंद्र गजरे, राजेंद्र चौधरी, पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार, आदी उपस्थित होते .