जळगाव ;- येथील शहर पूज्य सिंधी पंचायतीच्या अध्यक्षपदी जनता शॉपीचे संचालक शीतलदास हरीओमल जवाहरानी यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी कमलेश वासवानी यांची निवड २०१८च्या नूतन कार्यकारिणीत करण्यात आली आहे . नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे सिंधी समाज बांधवांनी अभिनंदन करण्यात आले आहे .
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष -शीतलदास हरीओमल जवाहरानी ,उपाध्यक्ष -गुलाब चुगडा ,उपाध्यक्ष-मुकेश टेकवाणी , सचिव-कमलेश वासवानी , सह-सचिव -अशोक खटवाणी , खजिनदार – प्रदीप आहुजा .
निवडीबद्दल बोलताना अध्यक्ष शीतलदास जवाहरानी यांनी सांगितले कि , सिंधी समाज बांधवांच्या अडीअडचणी समजून त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून सिंधी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले .