शहरासह जिल्हाभरातील १५ केंद्रावर नीट परिक्षा पडली पार

0

जळगाव : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणारी नीट परिक्षा रविवारी शहरासह जिल्हाभरातील १५ केंद्रावर पार पडली. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या ५ हजार विद्यार्थ्यांपैकी साडेचार विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली.

केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही सामाईक प्रवेश परिक्षा घेण्यात येते. ही परिक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई मंडळाने अत्यंत कडक नियमावली केली होती. दुपारी २ ते ५ अशी परिक्षेची वेळ असताना,परिक्षेआधी अर्धातास विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचान करण्यात आल्या होत्या.

जिल्ह्यातील चाळीसगाव, भुसावळ व जामनेर या ठिकाणी प्रत्येकी एक तर जळगाव शहरात १२ परिक्षा केंद्रे होती. यामध्य ओरिएन सीबीएससी स्कूल, मु. जे. विवेकानंद भवन, सेंट जोसेफ इंग्लीश स्कूल  व इतर परिक्षा केंद्रे होती. परिक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी करण्यात येत होती. तसेच वर्गात गेल्यावर स्वाक्षरी, हॉल तिकीट, बोटांचे ठसे अशा प्रकारे अत्यंत कडक तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रत्येक  परिक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आॅफलाइन पद्धतीने होणाºया परीक्षेत १८० बहुपयार्यी प्रश्न विचारण्यात आले.  प्रत्येक योग्य उत्तरास ४ गुण तर चुकीच्या उत्तरास -१ गुण (वजा एक गुण ) असे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

पालकांची परिक्षा केंद्राबाहेर गर्दी –

ऐन उन्हाळ््यात दुपारी दोन वाजता ही परिक्षा असल्याने, बहुतांश पालकवर्ग दुपारी एक पासूनच आपल्या पाल्यांना घेऊन परिक्षा केंद्रावर आले होते. पोलिसांतर्फे फक्त विद्यार्थ्यांनाच हॉल तिकीट पाहून आत सोडण्यात येत होते. तसेच बॅग,पाकीट, मोबाईल,पट्टा व इतर परिक्षा मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांतर्फे या वस्तू परिक्षा केंद्राबाहेरच ठेवण्याच्या सूचना करण्यात येत होत्या. दरम्यान, परिक्षा संपेपर्यंत बहुतांश पालक केंद्राबाहेर मिळेल त्या ठिकाणी सावलीचा आधार घेऊन, थांबलेले दिसून आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.