Saturday, January 28, 2023

शहरात वाढतोय ‘वेड्यां’चा ‘वेडे’पणा; भररस्त्यात लज्जास्पद कृत्य

- Advertisement -

 जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  

शहरात कुटुंब आणि समाजव्यवस्थेने नाकारलेल्या वेड्यांची (मनोरुग्ण ) संख्या दिवसागणिक वाढू लागली आहेत. ते कुठले आहेत, कुठून आले आहेत, हा संशोधनाचा भाग असला तरी त्यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने भर रस्त्यात, गल्लीत, कॉलनीत त्यांचे विचित्र वर्तन वाढू लागल्याने समाजव्यवस्था बिघडू लागली आहे. तर यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव घुटमळू लागला आहे. यासाठी पोलिसांनी आणि एखाद्या सामाजिक संस्थेने संयुक्तपणे पुढाकार घेत या वेड्यांचे पुर्नवसन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वेड लागलेले महिला पुरुष टॉवर चौक, बळीराम पेठ, कोर्ट चौक, बसस्टॉप परिसर रेल्वे स्थानक परिसरात, तहसील कार्यालयाच्या आवारात, नगरपालिके बाहेर, गोलाणी मार्केट, फुले मार्केट, ठिकठिकाणी दिसून येत आहे. मळकटलेले कपडे, डोक्यावर आणि दाढी, मिशा वाढलेले, हाता पायांच्या बोटांची लांबसडक नखे, तोंडातून टपकणारी लाळ, हातात फाटक्या तुटक्या कपड्यांचे गाठोडे आणि स्वतःशीच बडबड करीत भररस्त्यावर अशी कृत्य करत जोराने घाणेरडे शब्द वापरतात. मिळेल त्या ठिकाणी निवारा शोधत बसतात.

- Advertisement -

वरवर शांत वाटत असले तरी त्यांच्या मनातील द्वंद्व केव्हा उफाळून येईल, हे सांगता येत नाही. म्हणूनच वेडेपणाचे झटके येत नाहक रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना दगड मारणे, अंगावर धावून जाणे, अंगावरील सर्व कपडे काढून नागडे फिरणे, घुर्रने, खुन्नस देणे, असा प्रकार होत आहे. त्यामुळे परिसरातील आजूबाजूने वावरणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत असते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे